फुटबॉलच्या प्रगतीसाठी भारतीयांना बदलावी लागेल मानसिकता – जिको

jiko
नवी दिल्ली – भारताला फुटबॉलमध्ये यश मिळवायचे असेल तर देशी खेळाडूंना स्वत:च्या खेळावर विश्वास ठेवून सध्याची मानसिकता बदलावी लागेल, असे मत ब्राझिलचा फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक जिको याने व्यक्त केले आहे. इंडियन सुपर लीगची सुरुवात रविवारी होणार आहे. जिको गोवा एफसी संघाचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी निभावणार आहे. आयएसएलमध्ये भारतीय फुटबॉलमध्ये खेळल्याने भारतीय खेळाडूंची मानसिकता बदलेल असे म्हटले जात आहे. मात्र जिकोचे मत वेगळे आहे. त्याने सांगितले की, हे सारे खेळाडूंच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. भारतीय खेळाडूंमध्ये प्रगती करायची इच्छा असेल, तर ते नक्कीच चांगल्या प्रशिक्षणातून लक्ष गाठू शकतील. जिको म्हणाला की, मी व्यावसायिक दृष्टिकोनातून फुटबॉलच्या खेळाकडे पहातो. भारतीय फुटबॉल महासंघ आणि सरकार संयुक्तपणे या विषयावर काम करतील, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

Leave a Comment