बांद्र्यातील पीएन ज्वेलर्सच्या इमारतीला आग

jweller
मुंबई – बांद्र्यातील एस.व्ही. रोडवरील पीएन ज्वेलर्सच्या इमारतीला आज सकाळी अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी पाण्याचे चार टँकर आणि अग्निशमन दलाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या. या इमारतीशेजारी पेट्रोल पंप असल्याने धोका वाढला आहे. आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जवान करत आहेत. इमारतीच्या वरच्या मजल्याला आग लागली असून तळमजल्यावर टायटनचे शोरूम आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तर काल गोरेगाव पूर्वमधील आरएसी इंडस्ट्रिअल इस्टेटमधील कमर्शिअल इमारतीला आग लागली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरूच आहे.

Leave a Comment