दरवर्षी ४ सप्टेंबर साजरा होणार ‘बृहन्मुंबई पालिका दिन’

mumbai-corporation
मुंबई – मुंबई पालिकेच्या पहिल्या ४ सप्टेंबर १८७३ रोजी झालेल्या सभेत मुंबई महानगरपालिकेची रीतसर स्थापन झाली होती. त्यामुळे आता दरवर्षी ४ सप्टेंबर हा दिवस ‘बृहन्मुंबई महानगरपालिका दिन’ म्हणून साजरा करण्याचा आणि त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करण्याबाबत आयुक्त सीताराम कुंटे यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. ४ सप्टेंबर १८७३ रोजी महापालिकेची स्थापना झाल्याने हा दिवस मुंबई दिन म्हणून दरवर्षी साजरा करावा. आयुक्त सीताराम कुंटे यांनी पालिकेत शिव जयंती डॉ. आंबेडकर जयंती इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. गुणवंत अधिका-यांना आणि कर्मचा-यांना वेतनवाढ देऊन प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे ४ सप्टेंबर हा दिवस मुंबई दिन साजरा करण्याची आवश्यकता नाही, असे अभिप्राय दिले होते.

Leave a Comment