चीनमध्ये भूस्खलनाने १९ ठार

china
बीजिंग – चीनमधील शांग्सी प्रांताच्या गांगुआन काऊंटी शहरात भूस्खलनाने १९ जण ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भूस्खलन झाले त्यावेळी महामार्ग निर्माण करणारे कर्मचारी एका मोठ्या खोलीत झोपले होते. स्थानिक वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये नऊ जण घटनास्थळी ठार झाले असून तर उपचारादरम्यान इतर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये रस्ते बांधणीसाठी डोंगराळ परिसरातील अनेक झाडे तोडण्यात आली होती. त्यामुळे चीनवर आज ही स्थिती ओढावली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Leave a Comment