आयपीएलमुळे पीटरसनचे डोके ठिकाणावर नाही – नासिर हुसैन

naseer-hussain
लंडन – आपल्या आत्मचरित्रामुळे वादाच्या भोव-यात सापडलेल्या केविन पीटरसनचे डोके ठिकाणावर नाही, अशी टिका इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने केली आहे. हुसैन यांनी म्हटले आहे की, इंडियन प्रिमियर लिगमुळे (आयपीएल) पीटरसनच्या मनस्थितीत बदल झाला आहे. आयपीएलमुळे त्यांना असे वाटत आहे की, ते संघात मोठे आहेत आणि अन्य खेळाडूंना त्यांच्या कमाईमुळे इर्षा होत आहे. इंग्लंड संघात सर्वांत यशस्वी खेळाडूंमध्ये एक असलेल्या पीटरसनचे विचार पूर्णत: बदललेले आहेत. इंग्लंड संघातून निलंबित केलेल्या पीटरसनने आपल्या आत्मचरित्रात माजी प्रशिक्षक एंडी फ्लावर याच्यावर देखील टिका केली आहे. याबाबत हुसैन म्हणाला की, फ्लावरने पीटरसनला योग्य दिशा दाखवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. पण जेव्हा इंग्लंडच्या विरोधात स्थिती जाऊ लागली आणि स्टार फलंदाज एका खेळाडूसारखा वागत नव्हता. तेव्हा त्यांनी आता पुरे झाले असे म्हटले होते. त्यांच्यासाठी कोणीही चूकीचे असू शकत नाही. जगात सर्वाधिक समालोचकपैकी एक असलेल्या हुसैन यांनी आशा व्यक्त केली की, एक दिवस पीटरसन दुस-याला दोषी ठरवायचे सोडून आपल्या चूकांकडे लक्ष देणार आहे. एक दिवस कदाचित पीटरसन दुस-यांना दोषी ठरवण्याऐवजी इंग्लंड संघासोबत त्यांचे व्यवहार कसे होते यासाठी तो स्वत:चे परिक्षण करेल.

Leave a Comment