इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी केली अजून एका पत्रकाराची हत्या

isis
बगदाद – इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी उत्तर बगदादमधील शहर आणि गावातील १३ नागरिकांची हत्या केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पत्रकार आणि त्याच्या भावाचादेखील समावेश आहे. मृत पत्रकाराच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वृत्तवाहिनी समा सलाहेद्दीनकरिता काम करणा-या एका ३७ वर्षीय कॅमेरामन राद अल अजवी आणि त्याच्या भावाची तिरकितजवळील समारा गावात हत्या करण्यात आली. रिपोर्ट विदआऊट बॉर्डरसच्या अहवालानुसार, अजवी यांना सप्टेंबरमध्ये बंधक बनविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी इस्लामिक स्टेट संघटनेकरिता काम करण्यास नकार दिल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी याच गावातील अन्य दोन नागरिकांची हत्या केली आहे. तर उत्तर तिरकितमध्ये ९ नागरिकांना मारले आहे. सुरक्षा अधिका-यांच्या मते, या सर्वांना जिहादविरोधात काम करण्याच्या संशयावरुन मारण्यात आले आहे.

Leave a Comment