अफगाणिस्तानातील आत्मघातकी स्फोटात एक पोलीस ठार

blast
काबूल – पोलीस अधिकायाच्या गणवेशात आलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोरानने हेल्माड प्रांतातील पोलीस मुख्यालयात स्फोट घडविल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी दिली आहे. या स्फोटात एक पोलीस कर्मचारी मारला गेल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पोलीस प्रवक्ते फारेड ओबियाड यांनी सांगितले की, प्रांताची राजधानी लष्करगाह येथे हा स्फोट घडविण्यात आला. सदर हल्लेखोराला मुख्यालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. जेव्हा त्याने स्वतःचा स्फोट घडवून आणला तेव्हा तेथे उपस्थित असलेला एक पोलीस कर्मचारी मारला गेला. तसेच अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. या आत्मघातकी हल्ल्याची अद्यापपर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने जबाबदारी स्विकारलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment