मलाला ही संयुक्त राष्ट्रसंघाची मुलगी – मून

ban-ki-moon
वॉशिंग्टन – संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई ही संयुक्त राष्ट्रसंघाची मुलगी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील नोबेल पुरस्कार विजेत्या कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई यांना शुभेच्छा दिल्या असून, मानवतेचे रक्षण करणा-यांचा हा विजय असल्याचे म्हटले आहे.

ओबामांनी एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, हा त्या सर्व नागरिकांचा विजय आहे, जे मानवतेच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करत आहेत. मलाला आणि कैलाश यांच्या कामाला विचारात घेऊन नोबेल समितीने आपल्याला ही आठवण करुन दिली आहे की, सर्व युवकांच्या हक्कासाठी तसेच स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता त्यांचे काम किती महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. तर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनीदेखील मलाला आणि सत्य़ार्थी यांना देण्यात आलेल्य़ा नोबेल पुरस्काराचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, संपूर्ण जग हे बालमजूरी विरोधात आहे. मात्र आजही कैलाश यांचे अविरत कार्य तसेच चालू आहे. जगात बालमजूरीबाबत जागरुकता आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment