संमेलनाध्यक्षपद निवडणूकीसाठी मतपत्रिका येण्यास सुरूवात

election
पुणे – ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या असून त्या मतपत्रिका महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या मतपेटीत येण्यास प्रारंभ झाला आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीचा निकाल १० डिसेंबरला जाहीर होईल.मराठी साहित्य महामंडळासाठीचे निवडणुक निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर ही मतपत्रिका पोस्टाने पाठवण्याची अंतिम तारीख होती. त्यानुसार चार उमेदवारांच्या उपस्थितीत मतपत्रिकांसाठीची मतपेटी सीलबंद करण्यात आली.

Leave a Comment