
पुणे – माजी उद्योगमंत्री नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही उपद्रववादी पार्टी असून या पक्षाचे राजकारणच पाडापाडीचे व फोडाफोडीचे आहे. कारण या पक्षात गावागावांतून ओवाळून टाकलेले लोक आहेत, अशी जहरी टीका राष्ट्रवादीवर केली आहे. इंदापूरमधील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी राणे आले होते. त्यावेळी राणेंनी राष्ट्रवादीसह अजित पवारांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
राष्ट्रवादी ही उपद्रववादी पार्टी – नारायण राणे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी आहे हे सर्वांनाच माहित आहे. या पक्षाने आजपर्यंत लुटालुटीचे, पाडापाडीचे व फोडाफोडीचेच काम केले आहे. आताच्या लोकसभेवेळी पवार काका-पुतण्यांनी कुरघोड्या करून माझा मुलगा निलेशला पाडले. काँग्रेसला थांबून राष्ट्रवादीला मोठा पक्ष करण्याचा अजित पवारांचा डाव आहे. पण तो कधीच यशस्वी होणार नाही. अजित पवार आयुष्यात कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत. त्यांच्यात त्याची ना गुणवत्ता आहे ना क्षमता. मूळात या पक्षातच गावागावांतून ओवाळून टाकलेले लोक आहेत, अशी टीका राणेंनी केली.
