यापुढेही विकास साधण्यासाठी आम्ही कटीबद्ध – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj-chavan
पुणे – पुणे शहराचे नागरीकरण वेगाने होत आहे, त्यामुळे शहराचा झपाट्याने विकास करण्याची गरज असून कॉंग्रेसच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सर्वांना एकत्र घेऊन विकास करण्यावर कॉंग्रेसने भर दिला असून, यापुढेही विकास साधण्यासाठी कटिबध्द असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्याच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल आबा बागूल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

महापौर अथवा उपमहापौर ही पदे शोभेची नसून या पदाच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणासाठी जिद्दीने काम करण्याची गरज आहे असे मत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. पुणे शहरातील गोरगरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि नागरिकांना तत्परतेने सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमहापौर आबा बागूल यांनी यावेळी दिली.

Leave a Comment