पाकिस्तानमध्ये विषारी मद्य सेवनाने २७ ठार

pakistan
इस्लामाबाद – पाकिस्तानमधील कराची शहरात विषारी मद्य सेवन केल्याने २७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ईद सणाच्या निमित्त मद्य सेवन केल्यानंतर त्यांची स्थिती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिन्ना पोस्टग्रेज्युएट मेडिकल सेंटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, विषारी मद्य सेवन केलेले लोक लांधी, कोरंगी आणि चनसेर गोथ या परिसरातील रहिवाशी होते. त्या सर्वांचे वय २० ते ४५ दरम्यान होते. यामध्ये २६ जणांवर उपचार सुरु असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकारी मुनिर शेख यांनी सांगितले की, कमी दर्जाच्या मद्य विक्रीची परवानगी दिल्याप्रकरणी पोलीस स्थानकातील चार कर्मचारी तसेच दोन पोलीस उपअधिक्षकांना निलंबीत करण्यात आले आहे.

Leave a Comment