ड्रग्ज, वेश्यागमन करणार्‍या कलाकाराना प्रसिद्धी नाही- चीनचा निर्णय

chan
चीन सरकारने अमली पदार्थ सेवन तसेच वेश्यागमन करणार्‍या चीनी कलाकारांचे कोणतेही कार्यक्रम कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांनी दाखवू नयेत असे आदेश जारी केले आहेत. यामुळे अशा कलाकारांचे कार्यक्रम टीव्हीवर दिसणार नाहीत, त्यांचे चित्रपट दाखविले जाणार नाहीत तसेच अन्य मिडीया कार्यक्रमातूनही त्यांचे दर्शन होऊ शकणार नाही.

चायना डेलीने दिलेल्या माहितीनुसार फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुधारणा करण्यासाठी हे निर्बंध जारी केले आहेत. प्रेस, पब्लीकेशन, रेडिओ, चित्रपट, टिव्ही संस्थांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कलाकारांच्या या व्यसनांचा देशातील तरूण पिढीवर वाईट परिणाम होत आहे. चीममध्ये अनेक कलाकारांना अमली पदार्थ सेवन केल्यप्रकरणी अलिकडे अटक केली गेली असून त्यात चॅकी चॅनचा मुलगा जेसी याचाही समावेश आहे. निर्माता वान क्वानान आणि अभिनेता हुआंग हायबो यांनाही वेश्यागमन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व कलाकारांच्या कार्यक्रमांचे प्रसारण थांबविले गेले आहे.

चीनची कमान २०१२ साली शी जिगपिंग यांनी स्वीकारल्यापासून भ्रष्टाचार विरोधी अभियान अतिशय कडकपणे चालविले जात असून ड्रग, जुगार, वेश्यालये यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश फेब्रुवारीतच जारी करण्यात आले आहेत.