१०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारताच्या दारात- मोदी

modi2
इंदौर – भारताच्या दरवाजा १०० अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक ठोठावते आहे आता प्रत्येक राज्याने ही संधी साधून आपल्या राज्यात ही गुंतवणूक कशी न्यायची याचा विचार करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. इंदौर येथे भरलेल्या जागतिक गुंतवणूक संमेलनात ते बोलत होते.

आपल्या मेक इन इंडिया अभियानाचा उद्देशच परदेशी गुंतवणूक भारतात व्हावी हा असल्याचे सांगून ते म्हणाले की जगाने भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणून पाहू नये तर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जायला हवा. यामुळे भारतीयांची क्रयशक्तीही वाढणार आहे. जपान, चीन, अमेरिका या देशांकडून १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसाठी उत्पादकांकडून भारताच्या व्हीजासाठी मागणी होत आहे. ही गुंतवणूक आपल्या राज्याकडे वळवायची संधी देशातील सर्व राज्यांनी साधून घ्यायला हवी. आम्ही रस्ते खुले केले आहेत, जे राज्य तयार आहे ते या गुंतवणुकीतील मोठा हिस्सा मिळवू शकणार आहे.

Leave a Comment