अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना कटीबद्ध

shivsena
मुंबई : शिवसेनेने आपला ‘वचननामा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रसिद्ध केला आहे. शिवसेनेने महाराष्ट्राबाबत असलेले आपले व्हिजन जाहीर केले. ‘मातोश्री’ येथे झालेल्या कार्यक्रमात निवडक नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.

वचननामा असला तरी तो माझा संकल्प असून, तो मी पूर्ण करणारच असा विश्वास ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला. ग्रामिण विद्यार्थांना मोफत टॅब, महालक्ष्मी रेसकोर्सवर भव्य थीम पार्क उभारणे, कोस्टल रोड तयार करणे, मुंबईच्या सौंदर्यावर भर देण्याबरोबर बिझनेस हब तयार करणे, राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्याबरोबर टेलिमेडिसीन योजना राबविण्याचा संकल्प या वचकनाम्यात करण्यात आला आहे. अखंड महाराष्ट्रासाठी कटीबद्ध राहण्याबरोबर राज्यात व्हर्च्युअल क्लास रूमच्या सोयी-सुविधा उपलबद्ध करण्याचा संकल्प या वचकनाम्यात करण्यात आला आहे.

Leave a Comment