… तरच इंग्लंड संघात येईन – पीटरसन

kevin
लंडन – इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने सांगितले आहे की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट संघा (र्इसीबी) चे प्रमुख जाइल्स क्लार्क पदावरून हटले तर, मी निवृत्तीतून पुनरागमन करून पुन्हा खेळण्याचा विचार करील. या ३४ वर्षाच्या फलंदाजाचे आत्मकथनपर पुस्तकाचे नुकतेच अनावरण झाले. पीटरसनने ‘केपी : द ऑटोबायोग्राफी’ या नावाच्या आत्मकथेत आपले माजी सहकारी, माजी प्रशिक्षक एंडी फ्लॉवर आणि र्इसीबीवर खूप टिका केली आहे. पीटरसनने सांगितले की, इंग्लंड संघात पुनरागमन करायचे झाले तर, त्यासाठी जाइल्स क्लार्क यांना पदावरून हटावे लागेल. क्लार्कला आपले पद सोडावे लागेल आणि काही महिन्यात असे होणारच आहे. मी असे ऐकले आहे. परंतु खरे काय आहे? याबाबत मला निश्चित काही माहित नाही.

पीटरसनला र्इसीबी अधिकारी आणि सहका-यांसोबत झालेल्या विवादामुळे आठ महिन्यांपूर्वी संघातून काढून हटविण्यात आले होते. इंग्लंडचा माजी कर्णधार एलेक स्टीवर्टने केविन पीटरसनच्या मताचे समर्थन केले आहे. ज्यात या फलंदाजाने सांगितले होते की, इंग्लंडच्या माजी कर्णधारा (स्टीवर्ट) ने र्इसीबीला सांगितले होते की, संघाच्या तीन सदस्यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करण्यात आले होते. स्टीवर्टने सांगितले की, २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ओवल कसोटी सामन्यादरम्यान रिचर्ड बेलीने त्याला सांगितले की, त्यांनी केपी जिनियस नावाचे बनावट अकाउंट उघडले आहे आणि ग्रीम स्वान, स्टुअर्ट ब्रॉड आणि टिम ब्रिसनेन या अकाउंटला चालवत आहेत. बेलीचा अधिकृतरित्या इंग्लंड संघाशी संबंध नव्हता आणि तो ब्रॉडचा मित्र होता.

Leave a Comment