हृतिक होणार एफसी पुणे संघाचा सहमालक?

hrithik
पणजी – इंडियन सुपरलीग स्पर्धेतील एफसी पुणे सिटी या फुटबॉल संघाचा सहमालक सलमान खानऐवजी अभिनेता हृतिक रोशन होण्याची शक्यता आहे. इंडियन सुपर लीग स्पर्धेत वधवान समूहासोबत अभिनेता सलमान खान पुणे संघाची सहमालकी घेणार होता. मात्र इतर अभिनेत्यांप्रमाणे सलमान खान पुणे संघाला वेळ देऊ शकत नसल्याचे सूत्रांकडून समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफसी पुणे संघ सध्या अभिनेता हृतिक रोशनसोबत याबाबत चर्चा करत आहे आणि या दोघांमध्ये करारदेखील होण्याची शक्यता आहे. रविवारी कोलकाता येथे इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या अनावरण प्रसंगीदेखील हृतिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हृतिकशिवाय अभिषेक बच्चन (चेन्नई), जॉन अब्राहम (गुवाहाटी) आणि रणबीर कपूर (मुंबई) हेदेखील इंडियन सुपरलीगमध्ये सहभागी झाले आहेत.

Leave a Comment