मोबाईल ऍपद्वारे मिळणार मतदान केंद्राची माहिती

apps
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका २२ युवकाने मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केले आहे. या ऍप्लिकेशनद्वारे मतदार आपल्या मतदान केंद्राबाबतची माहिती सहजरित्या मिळवू शकणार आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिंग्स विद्यापीठातून नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केलेल्या आणि डेटा सायन्टिस्ट असलेल्या श्रीकांत निंबाळकरने हे ऍप्लिकेशन विकसित केले आहे. श्रीकांतने सांगितले की, मतदार ऍण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमद्वारे आपल्या मोबाईल फोनवर मतदार यादी डाऊनलोड करू शकतात. अंतिम काळात मतदार यादीत नाव नोंदणी केलेल्या मतदात्यांसाठी हे ऍप्लिकेशन फायदेशीर ठरणार असल्याचे श्रीकांतने सांगितले. जर मतदारांना आपल्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि पत्ता हवा असेल, तर त्यांनी मतदार यादी उघडून, त्यात जिल्हा आणि मतदान क्षेत्र निवडावे आणि आवश्यक ते रकाने भरल्यानंतर ‘शोधा’ बटण दाबावे. त्यानंतर लगेचच मतदारांना मतदान केँद्राचा क्रमांक आणि पत्ता मिळणार आहे, असे श्रीकांतने सांगितले.

Leave a Comment