यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी चा मार्ग मोकळा !

ycou
नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत नियमित पीएच.डी सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच यापूर्वी ज्यांची पीएच.डी २००९ च्या यूजीसीच्या मार्गदर्शक नियमांनुसार नाही, त्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पीएच.डीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून एम.ए. मास कम्युनिकेशन जर्नालिझम शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. एम.ए. शिक्षणक्रम अन्य विद्यापीठांच्या सहकार्याने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्राची ओळख, माहिती व्हावी म्हणून ‘पर्यावरणशास्त्र’ विषयाचा विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांतर्गत सुरू असलेल्या पदवी शिक्षणक्रमात समावेश करण्याचाही अतिशय महत्वाचा निर्णय या वेळी घेण्यात आला. व्यवसायाभिमुख आणि कौशल्याधिष्ठीत नवीन शिक्षणक्रम निरंतर विद्याशाखेमार्फत लवकरच सुरू करण्याबाबत चर्चा झाली. याबरोबरच कम्युनिटी कॉलेजसाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले.

Leave a Comment