डिसेंबरमध्ये प्रदूषणमुक्त एसटी बसेस उतरणार रस्त्यावर !

st
यवतमाळ – खाजगी बसेसशी स्पर्धा करण्यासाठी महामंडळाने एसटी बसेसच्या आधुनिकीकरणाबरोबरच त्यात नाविन्यता आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वातानुकूलित आरामदायी बसेस महामंडळाच्या सेवेत दाखल होत आहेत. त्यातही आता कमी डिझेल लागणारे इंजिन परिवहन महामंडळाने विकसित केले आहे. यामुळे प्रदूषणमुक्त आणि कमी डिझेल लागणा-या बसेस तयार करण्याचे काम सुरू आहे.

राज्यातील विविध आगारांना अडीच हजार बसेस लागणार आहेत. या बसेस लवकर मिळाव्या म्हणून प्रत्येक विभाग प्रमुख प्रयत्नात आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. या बसेस डिसेंबर महिन्यात महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे एसटी कर्मचा-यांचे म्हणणे आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी नवीन चेसीस तयार करणारे युनिट मागे पडल्याने नागपूर, पुणे आणि औरंगाबाद मध्यवर्ती कार्यशाळेतील बस निर्मिती प्रभावित झाली आहे. परिणामी अडीच हजार एसटी बसेस प्रलंबित यादीत आहेत. मध्यंतरी काही दिवस महामंडळाच्या नवीन बसेस तयार करण्याचे काम थांबले होते. मात्र आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. महामंडळाच्या जुन्या बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. अशा बसेसचा लिलावही झाला. तसेच सेवाकाळ संपलेल्या बसऐवजी नवीन बसेसची मागणी प्रत्येक जिल्ह्यातून करण्यात येत आहे.

Leave a Comment