युती तुटल्यानंतर उद्धवबरोबर चर्चा झाली – राज ठाकरे

raj-thackarey
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार किंवा नाही? या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांनी एका वाहिनीला दिलेल्या कार्यक्रमात दिले आहे. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी राज यांचे फोनवर बोलणे झाले होते. त्या दोघांमध्ये रणनीतीही ठरली. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून नंतर प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे अखरे उशीर झाला असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सर्व राष्ट्रीय पक्ष आपले टार्गेट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यात भेदभाव करू नये. त्यांच्या सभांना माझा आक्षेप नाही. मात्र, सीमेवर गोळीबार सुरू असताना ते महाराष्ट्रात प्रचार सभा घेत असल्याबद्दल ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. अफझलखानाच्या फौजेत शिवसेनेचाही एक खासदार असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेलाही फटकारले. रामदास आठवले हे टुकार नेते असल्याचे सांगत अशा नेत्यांमुळे देशपातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जात आहे. असल्या नेत्यांना शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जात असल्याबद्दल ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

राज्यातल्या टोल प्रश्नावर विरोधी पक्ष 15 वर्ष गप्प होता. मात्र, मनसेच्या आमदारांनी यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता विरोधी पक्षनेत्याने त्यांना सभागृहात बोलू दिले नाही, असे सांगत ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर शरसंधान साधले.

Leave a Comment