फ्रान्सच्या पेट्रीक मोदियानो यांना साहित्य विभागातील नोबेल

nobel
स्टॉकहोम – फ्रान्सच्या पेट्रीक मोदियानो यांना साहित्य विभागातील नोबेल पुरस्कार जाहिर झाला आहे. ६९ वर्षीय मोदियानो हे प्रामुख्याने फ्रेन्च साहित्यिक असून, त्यांच्या अनेक साहित्याचा स्विडीश भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. नोबेल समितीने दिलेल्या माहितीनुसार, मोदियानो यांनी अनेक जुन्या विषयांवर आधारित असलेल्या कादंब-या लिहिल्या आहेत. यावेळेस साहित्य विभागातील नोबेल पुरस्काराकरिता आफ्रिकन लेखर नगूगी वा थियोंगो आणि जपानी लेखक हारुकी मुराकामी यांचे नावदेखील चर्चेत होते, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment