अखेर दीपिका- दिनेश कार्तिक करणार विवाह

combo
नवी दिल्ली – भारताच्या खेळविश्वातील प्रसिद्ध जोडी स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लिकल आणि क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर अखेर विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता. दीपिकाने मागे ट्विटरवर साखरपुड्याची अंगठी दाखविली होती. तर, यावेळी कार्तिकने विवाहाच्या योजनेचा खुलासा स्वत: केला आहे. कार्तिकने सांगितले की, मी विवाहासाठी तयार आहे. दीपिका पूर्वीपासूनच यासाठी तयार होती. आता आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला विवाहाची भिती वाटत नाही. कार्तिक आणि दीपिकाला व्यग्र कार्यक्रमांमुळे आपले लग्न लांबवावे लागले होते. विशेषकरून दीपिकाला आशियार्इ खेळ आणि राष्ट्रकुल खेळांवर लक्ष द्यायचे होते. या स्क्वॉश खेळाडूने या खेळातून तीन पदक प्राप्त केले. दीपिकाने सांगितले की, दिनेशसोबत मी मागील दिड वर्षापासून आहे आणि मी त्याच्यासोबत चांगल्या साथीची अपेक्षा करते आहे, असेही ती पुढे म्हणाली.

Leave a Comment