फोर्ब्सच्या यादीत धोनी एकमेव भारतीय खेळाडू

dhoni
न्यूयॉर्क – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फोर्ब्सच्या मोस्ट वॅल्यूएबल एथलीट ब्रांड्सच्या यादीत स्थान मिळविणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत अमेरिकेचा बास्केटबॉल खेळाडू लीब्रॉन जेम्स अव्वल स्थानी असून, गोल्फर टाइगर वुड्स आणि टेनिस खेळाडू रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल देखील सामिल आहेत. धोनी वर्ष २०१४ मध्ये या यादीत २० मिलियन अमेरिकी डॉलरसह पाचव्या स्थानावर आहे. फोर्ब्सनुसार धोनीने २०१३ च्या अखेर स्पारटान स्पोर्टससोबत बॅट आणि एमिटी विद्यापीठासोबत प्रायोजकत्वाचा करार केला जो जवळपास ४ मिलियन अमेरिकी डॉलर इतका वर्षाला आहे. तसेच त्याला रिबॉक १ मिलियन डॉलर देत आहे. एनबीए स्टार लीब्रॉन जेम्सची २०१४ मध्ये ब्रॅंड वॅल्यू ३७ मिलियन अमेरिकी डॉलर आहे. या स्टारने नाइकी, मैक्डॉनल्ड, कोका-कोला तसेच अन्य कंपन्यांकडून मिळालेल्या ५३ मिलियन डॉलरचा करार केला आहे. मात्र, त्याची ब्रॅंड वॅल्यू ३७ मिलियन डॉलर आहे. २००७ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा या यादीत अव्वल स्थानी वुड्सला स्थान देण्यात आलेले नाही. जेम्स चार सत्रानंतर क्लीवलैंड केवेलियर्स सोबत पुन्हा जुडणार आहे. वुड्स या यादीत ३६ मिलियन डॉलरसह दुस-या स्थानावर आहे. फेडरर ३२ मिलियन डॉलरच्या ब्रॅंडवॅल्यूसह तिस-या स्थानी आहे. या यादीत जमैकाचा स्प्रिंटर उसेन बोल्ट सहाव्या, रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सातव्या आणि अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियानेल मेस्सी नवव्या तर, टेनिसपटू राफेल नदाल १० व्या स्थानी आहे.

Leave a Comment