महिलांसाठी खास स्मार्ट इंडक्शन कुकटॉप्स

evision
ई व्हीजन ने खास महिलांसाठी ब्ल्यू टूथ, इन बिल्ट स्पीकर्स व यूएसबी पोर्टची सुविधा असलेले स्मार्ट इंडक्शन कुकटॉप्स बाजारात आणले आहेत. यामुळे स्वयंपाकाचे कंटाळवाणे काम आनंददायक होणार आहे. कारण यात स्वयंपाक करता करताच संगीताचा आनंद गृहिणींना मिळेलच पण ब्ल्यू टूथच्या सहाय्याने आपला फोन व ईडी स्मार्ट कनेक्ट करता येणार आहे.

स्वयंपाक करतानाच गाणी ऐकण्याबरोबरच ऑडिओ कुक बुक डाऊनलोड करणे, खास पदार्थ तयार करताना टीप्स मिळविण्यासाठी स्काईप चॅप वापरण्याचे ऑप्शनही यात दिले गेले आहे. कुकटॉपला यूएसबी पोर्ट दिले गेले असल्याने स्वयंपाक करतानाच या इंडक्शन कुकटॉपला जोडून मधल्या मोकळ्या वेळात आपला संगणक वापरणे अथवा फोन चार्ज करणेही शक्य होणार आहे. दिवाळी पाडव्यासाठी महिलांना ही आकर्षक भेट ठरू शकेल असा कंपनीचा दावा असून या उपकरणाची किंमत आहे ३९९९ रूपये. म्हणजे अगदी बजेटमध्ये.

Leave a Comment