परदेशातून स्वदेशी पैसे धाडण्यात भारताचा पहिला नंबर

nri
परदेशातून मायदेशात पैसे पाठविण्यात भारताचा पहिला नंबर लागला असून या वर्षात अनिवासी भारतीयांकडून स्वदेशात ७१ अब्ज डॉलर्स पाठविले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विकसित देशात स्थायिक झालेल्यांकडून विकसनशील देशातील आपल्या आप्तांकडे यंदाच्या वर्षात एकूण ४३५ अब्ज डॉलर्स पाठविले जातील असाही अंदाज असून २०१३ च्या तुलनेत त्यात ५ टक्के वाढ झाली असल्याचा अहवाल वर्ल्ड बँकेने दिला आहे.

जागतिक बँकेच्या या अहवालात भारतात २०१५-१६ सालात आर्थिक विकास दर ६.४ टक्कयांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतीय आर्थिक देवाणघेवाणीला अधिक चालना मिळाल्याचेही यात नमूद केले गेले आहे. याचाच अनुकुल परिणाम आर्थिक विकास दरवाढीवर होणार आहे. द.आशियातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा ८० टक्के इतका असल्याचे जागतिक बँकेचे वरीष्ठ उपाध्यक्ष व मुख्य अर्थतज्ञ कौशिक बसु यांनी सांगितले.

बसु म्हणाले की जगातील प्रवासी संख्येत भारतीयांची संख्या १.४० कोटी आहे आणि ही जगातील प्रवासी संख्येतील सर्वाधिक आहे. याचाच अर्थ अनिवासी नागरिकांकडून मायदेशात येणार्‍या पैशांचे स्थान अबाधित ठेवण्यात भारत यशस्वी ठरला आहे. चीननेही आपले स्थान कायम राखले असून भारतात या वर्षात ७१ अब्ज डॉलर्स तर चीनमध्ये ६४ अब्ज डॉलर्स परदेशातून पाठविले जातील

Leave a Comment