‘महाराष्ट्र माझा’ घेऊन न्यायालयात जाणार सुप्रिया सुळे

supriya
औरंगाबाद – राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीभारतीय जनता पक्षाच्यावतीने जाहिरातीतून आणि भाषणातून महाराष्ट्राची बदनामी केली जात असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. राज्यात काहीही झाले की शरद पवारांवर आरोप करण्याचे प्रकार आता राजकारण्यांनी थांबविले पाहिजेत असे देखील त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचारवादी अशी टीका केली आहे, ती बिनबुडाची असून त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करू असे त्या म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरूषांच्या नावाने शिवसेना आणि भाजपमध्ये खंडणीचे वाद चालू आहेत याचा संताप महाराष्ट्राच्या मनात आहे असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Comment