`मतदार चिठ्ठी’ १२ तारखेपर्यंतच घ्या; निवडणूक आयोगाचे आवाहन !

voters
पुणे – प्रत्येक मतदाराला घरोघरी जाऊन निवडणूक आयोगाने व प्रशासनाने लोकसभेपासून मतदार चिठ्ठी (व्होटर स्लीप) देण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यामुळे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कोठे आहे, मतदान केव्हा आहे याची माहिती उपलब्ध होते. यंदाच्या विधानसभेलाही मतदार चिठ्ठीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे मतदारांना याचा नक्कीच लाभ होणार आहे. आता मतदानाला अवघे आठ दिवस राहिले आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून खास मोहिम राबवली जात आहे. येत्या १२ तारखेला ज्या मतदारांची मतदार चिठ्ठी राहिली असेल त्यांनी ती घेऊन जाण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. तसेच ही चिठ्ठी सकाळी ९ ते ६ या वेळेत उपलब्ध होणार आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले होते. विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची पूर्ण काळजी आयोगाने यावेळी घेतली असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment