ताजमहाल पहाण्यास सानियाला अडविले

sania
आग्रा – भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला ताजमहाल पहाण्यासाठी प्रवेश नाकारण्यात आला. वेळेचे बंधन न पाळल्यामुळे सानियाला ताजमहालमध्ये जाण्यापासून अडविण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी सानिया मिर्झा ताजमहाल पहाण्यासाठी गेली. परंतु उशीराने. स्थानिक पर्यटन मार्गदर्शक वेद गौतमने सांगितले की, सानिया जोपर्यंत तेथे पोहोचली तोपर्यंत ताजमहालचे दरवाजे बंद झाले होते. त्यासाठी तिला आत जाण्यास मनार्इ करण्यात आली आणि तेथून ती निराश होऊन परतली. सानिया आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार अनिल कुंबळे मंगळवारी एका कार्यक्रमात सामिल झाले होते. त्याच दरम्यान ते ताजमहाल पहाण्यासाठी गेले होते. कुंबळेने ताजमहालच्या यात्रेचा खूप आनंद लुटला. परंतु निराश झालेल्या सानियाला ताजमहालच्या बाहेर लांबूनच स्वत:चे फोटो काढावे लागले.

Leave a Comment