आम्ही आमचा आत्मविश्वास गमाविला – मिस्बाह

misbha
दुबर्इ – पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिस्बाह-उल-हकने सांगितले की, फलंदाजीत आम्ही आमचा आत्मविश्वास गमाविला आहे. मिस्बाहच्या मते, या वार्इट परिस्थितीतून निघण्यासाठी संघाला एक किंवा दोन सामने जिंकणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियासोबत नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा संघ २५६ च्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ ३७ षटकात १६२ धावांवरच गुंडाळला गेला. याआधी रविवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यात देखील पाकिस्तानचा संघ २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ९६ धावाच करू शकला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर मिस्बाहने सांगितले की, मला वाटते की, अनेकदा आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. आमच्या संघासोबत आता हेच होत आहे. आम्हाला केवळ एक किंवा दोन सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. त्यानंतर आम्ही पुनरागमन करू. आम्ही आशावादी आहोत. मिस्बाहने मान्य केले की, त्याला कर्णधार म्हणून चांगला खेळ केला पाहिजे आणि सहका-यांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. मिस्बाह पुढे म्हणाला की, मी सलग प्रयत्न करतो आहे. मात्र, अनेकदा गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे मला सकारात्मक रहावे लागे आणि आपल्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी कसून सराव करावा लागेल, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment