इंदापूरात सापडले सात पोत्यांमध्ये पाच कोटी रुपये !

currency
इंदापूर – पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी परिसरात आचारसंहिता भरारी पथकाने पाच कोटी रुपये पकडले आहेत. एका कारमधून सात पोत्यांमध्ये असलेली पाच कोटींची रक्कम होती. पुणे-सोलापूर महामार्गावर आचारसंहिता भरारी पथकाचे प्रमुख आर.एन. गवंड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी एका चारचाकीमध्ये नोटांची सात पोती आढळून आली.पथक प्रमुख गवंड इंदापूर निवडणूक आचारसंहिचा कक्ष प्रमुख डॉ. एल.बी. वडापुरे, के. मोरे, के.आर. दराडे यांना तातडीने माहिती दिली. सदरची रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्याची शक्यता असून बँकेचे शाखाधिकारी आणि आयकर विभागाच्या अधिका-यांनी शहनिशा करण्यासाठी इंदापूरला बोलावले असल्याची माहिती इंदापूर विधानसभा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.प्रवास करताना सर्वसामान्य नागरिकांनी ५० हजार रुपयांपेक्षा जादा रक्कमेची ने-आणू करू नये, जवळ बाळगू नये. तसेच जास्त रक्कम असेल तर त्याबद्दलचे पुरावे बरोबर ठेवावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी केले आहे.

Leave a Comment