कोकणातील नेते निवडणूकीत व्यस्त, मात्र प्रवासी त्रस्त !

train
रत्नागिरी – मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक मंगळवारपासून ठप्प झाली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. कोकणातील नेते मंडळी मात्र सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. विस्कळीत रेल्वे वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी एक आठवडा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आजही कोकण रेल्वे मार्गावरील चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगाव-सीएसटी-मांडवी, सीएसटी-मडगांव-मांडवी, सावंतवाडी-दिवा आणि मडगांव-दिवा या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी ७.५५ च्या सुमारास चिपळूण ते कामथे दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरले. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

Leave a Comment