ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान ९३ धावांनी पराभूत

cricket
दुबई – स्टीवन स्मिथच्या करियरमधील पहिले एकदिवसीय शतक आणि मिशेल जॉनसनच्या तीन बळींच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस-रात्र एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पाकिस्तानला ९३ धावांनी पराभूत केले. स्मिथने आपल्या खेळात ११८ चेंडूंचा सामना करत १०१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने आठ बळींच्या तुलनेत २५५ धावा केल्या. यानंतर पाकिस्तान संघाने शारजाह मैदानावर खेळलेल्या या सामन्यात ३६.३ षटकांमध्ये १६२ धावा करून सर्व गडी बाद झाले.

पाकिस्तानकडून केवळ उमर अकमल आणि सरफराज अहमद काहिसा संघर्ष करू शकले. याआधी सलामीचा फलंदाज आरोन फिंचला जलद गोलंदाज मोहम्मद इरफानच्या चेंडूवर तंबूत परतावे लागले. त्यामुळे स्मिथला सामन्याच्या दुस-या चेंडूवर मैदानात उतरावे लागले. स्मिथने यानंतर डेविड वार्नरसोबत ८६ धावा काढत खेळाची स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने कर्णधार जार्ज बैलीसोबत ३७ रन केले. वार्नरला शाहिद अफ्रिदीने तंबूत पाठवले. तर बैली कामचलाऊ गोलंदाज फवद आलमच्या चेंडूवर आऊट झाला. पाकिस्तानकडून अफ्रिदीने सर्वाधिक चांगली गोलंदाजी राहिले आणि त्याने ४६ धावा देत तीन बळी घेतले.

Leave a Comment