वर्धा जिल्ह्यात १० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

voters
वर्धा – विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हयात १० लाख ४० हजार २४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५ लक्ष ४० हजार ६१९ पुरुष तर ४ लक्ष ९९ हजार ६१८ महिला मतदार असून ७ इतर मतदारांचाही समावेश आहे. निवडणूकीची प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्याकरिता ५ हजार ५६४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना निवडणूकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी ३१ जुलै २०१४ रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीमध्ये १० लक्ष ३६ हजार ६४१ मतदार होते. त्यानंतर विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण यादीनंतर ३ हजार ६०३ मतदारांची वाढ झाली असून जिल्हयात १० लक्ष ४० हजार २४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

Leave a Comment