कळवा-मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर अनेक आव्हाने !

awahd
आगरी आणि मुस्लिम समाजबहूल मतदारसंघ असलेला कळवा-मुंब्रा यामध्ये यंदाच्याविधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना सोबतच एमआयएम हि नवी मुस्लिमधर्मियामध्ये क्रेज असलेल्या पार्टीने शिरकाव केल्याने आव्हाडांना यंदा विधानसभेची वाट आडवळणाची ठरणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड निकरानेआणि केलेल्या कामाच्या आधारावर यातून वाट कशी काढतात याकडे सर्वाचे लक्ष लागलेआहे. ठाण्यातील १८ विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक कडवी लढत हि कळवा-मुंब्राआणि ठाणे शहर मतदार संघात चुरशीची ठरणार आहे.मुंब्रा स्टेशन परिसराचा विकास आणि कायापालट,मुंब्रावासीयांना दिलेल्या मुलभूत सुविधा,भारनियमन मुक्त मुंब्रा,अशा अनेकविकास कामाचा अजेंडा घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड हे निवडणूक लढवीत आहेत.मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र एकजुटीने आव्हाडाच्या विकासकामावर आक्षेपघेऊन उद्घाटने झाली,कामे नाही अशी बोंब उठवीत आहेत. मागील निवडणुकीतआमदार जितेंद्र आव्हाड यांना १६ हजाराची आघाडी मिळाली होती. यंदा मात्र वाटआड-वळणाची असेच चित्र दिसत आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात मुंब्राहा आगरी आणि मुस्लिम बहुल परिसर आहे. आमदार आव्हाड यांना मुस्लिम मतदाराचापाठींबा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढतीमुळे मताच्या विभाजनाचामोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंब्रामधील बहुल मुस्लिम मतदाराच्यामतामध्ये समाजवादी पार्टी,आणि एमआयएम तसेच कॉंग्रेसच्या यासीन कुरेशी यांच्या सहभागानेमुस्लिम मताच्या विभागाणीची शक्यता आहे. तर दुसरीकडे आगरीपट्टा असलेल्या परिसरात माजी ठामपा उपमहापौर अशोक भोईर, शिवसेनेचे दशरथपाटील, मनसेचे महेश साळवी याच्यात मते विभागली जाण्याची शक्यता नाकारता येतनाही. यात दशरथ पाटील हे प्रकल्पग्रस्ताचे नेते आहेत.मागील निवडणूकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना६१,५१० मते मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार राजन किणे यांना ४५,८२१ मतेमिळाली होती. तर मनसेचे उमेदवार प्रशांत पवार १५ हजार मते मिळाली होती. मात्र यंदा परिस्थिती वेगळीआहे. मागील निवडणुकीत मुस्लिम मतात घटकरणाराएकमेव पक्ष हा समाजवादीपक्ष होता. पण यंदा कॉंग्रेसने ही मुस्लिम असलेला यासीन कुरेशी याची संख्यावाढली आहे. यंदा शिवसेनेचे दशरथ पाटील हे मराठी मताच्या विभागणीतसिंहाचा वाटा उचलणार आहेत. तर मुस्लिम मताच्या विभागणीत यंदा सपा सोबत एमआयएमया नव्या मुस्लिम कार्डचा पक्ष ही आहे. तर आगरी मताच्या विभागणीत मनसेचेसाळवी,भाजपचे अशोक भोईर,शिवसेनेचे दशरथ पाटील याचा समावेश आहे. यामुळेयंदाचे समीकरण बिघडले असून आमदार आव्हाड यांना यावेळी मुख्य लढत दशरथ पाटीलयांना द्यावी लागणार आहे.

Leave a Comment