राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला ! – रामदास आठवलेंची टीका

ramdas
लोणावळा – माझ्या हातात सत्ता द्या, राज्याचे सोने करून दाखवतो असे म्हणणा-या आणि रामदास आठवलेंना बेडकाची उपमा देत त्यांची खिल्ली उडवणा-या राज ठाकरेंवर आठवलेयांनी जोरदार टिका केली आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना उद्देशून राज्याचे सोने करण्याच्या वल्गना करणा-यांनी नाशिकचा कोळसा केला अशी टिका केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसे काय देणार, असे सांगत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. लोणावळा येथील प्रचारसभेत आठवले बोलत होते. आठवले विशेष शैलीत मी बेडुक उड्या मारत नाही तर ढाण्या वाघासारखी उडी मारतो. बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचे टक्कल असे सांगत आठवलेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत आलो असे आठवलेंनी सांगितले. नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोघेही मुस्लिमविरोधी नाही अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.

Leave a Comment