इजिप्तमधील कट्टरवादी संघटनेने केला तिघांचा शिरच्छेद

ansar
कैरो – इजिप्तमधील एका कट्टरवादी समुदायाने एक चित्रफित जारी केली आहे. त्यात त्यांनी इस्त्राईलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था असलेल्या मोसादसाठी काम करणार्‍या तिघाजणांचा शिरच्छेद करताना दाखवला आहे. सिनई परिसरातील अन्सर बैत अल मरसद या संघटनेने ही चित्रफित जारी केली आहे. या चित्रफितीत सदर तीन व्यक्ती आपण मोसादसाठी काम करत असल्याचे मान्य करत आहे. त्यामुळेच त्यांचा शिरच्छेद करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या चित्रफितीत इस्लामिक स्टेट संघटनेचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल अदनानी याने सप्टेंबर दिलेल्या भाषणाचे काही मुद्दे टाकण्यात आले आहेत. ज्यात त्याने सिनई प्रांतातील कट्टरवादी संघटनांना इजिप्तच्या सुरक्षा दलातील सदस्यांना मारुन टाकण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात या संघटनेने चार जणांचा शिरच्छेद केला होता. त्यावेळेस सदर चौघांनी संघटनेची माहिती इस्त्राईलला दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले होते.

Leave a Comment