पाकिस्तानमध्ये वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची हत्या

murder
इस्लामाबाद – पाकव्याप्त पंजाब प्रांतात एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची अज्ञात बंदुकधार्‍यांनी गोळी मारुन हत्या केल्याचे सूत्रांकडून समजते. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार शहजाद गुजरावाला शहरातील कार्यालयात एका मित्रासोबत बसले होते. दरम्यान काही अज्ञात शस्त्रधारी आले आणि त्यांनी शहजाद यांच्यावर गोळीबार केला. शहजाद यांना या हल्ल्यात तीन गोळ्या लागल्या असून, ते जागीच ठार झाल्याचे सूत्रांकड़ून समजते. तर या हल्ल्यात त्यांच्यासोबत उपस्थित असलेला मित्र जखमी झाला आहे. पत्रकार शहजाद यांना त्यांच्या कामामुळेच लक्ष्य करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस याप्रकरणी पत्रकार शहजाद यांचे गेल्या काही दिवसातील वृत्त अहवालदेखील तपासून पाहणार आहेत. जेणेकरुन या हल्ल्यामागील उद्देश स्पष्ट होऊ शकतो, असे सूत्रांकडून समजते.

Leave a Comment