इपीएफओच्या भागधारकांना मिऴणार आता खात्याची तात्काळ माहिती !

epfo
नवी दिल्ली – कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या (इपीएफओ) चार कोटीहूनही अधिक भागधारकांना आता त्यांच्या खात्याची माहिती तात्काळ मिळू शकणार आहे. १६ ऑक्टोबर पासून ही सुविधा सुरु होणार आहे. (इपीएफओ)च्या सभासदांना विशेष स्वरुपात तयार करण्यात आलेल्या पोर्टलद्वारे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सार्वत्रिक खाता संख्या (युएएन) सभासदांच्या पोर्टलद्वारे इपीएफओ नियोजकांवर लक्ष ठेवण्यात येइल. त्यामुळे भविष्यनिर्वाह निधीचे अंशदान होत आहे की नाही यावर लक्ष्य ठेवता येणार आहे. युएएन सभासद पोर्टलची सुरुवात १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्यात सभासदांचे खाते पाहिले जातील. त्यानंतर इपीएफओच्या पोर्टलद्वारे इतर सुविधा पुरविल्या जातील. सार्वत्रिक खाते संख्या पोर्टेबल असणार आहे. भागधारकांना नोकरी बदलल्यानंतरही भविष्यनिर्वाह निधी खाते बदलण्यासाठी अर्ज देण्याची गरज लागणार नाही. इपीएफओच्या संकेतस्थळानुसार त्यांचे ४.१८ कोटी भागधारक आहेत.

Leave a Comment