जानेवारीपर्यंत पूर्ण होईल नेपाळ संविधानाचा पहिला मसुदा

sher
काठमांडू – नेपाळ संविधानाचा पहिला मसुदा जानेवारीपर्यंत तयार करण्यात येणार असल्याचे नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ कॉंग्रेसनेते शेर बहादुर देऊबा यांनी सांगितले. नेपाळ कॉंग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबद्दल देऊबा यांनी ब्रिटेनमध्ये राहणा-या नागरिकांचा विश्वास दृढ केला आहे. लंडन येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

संविधानाचा पहिला मसुदा वेळेवर पूर्ण व्हावा म्हणून सर्वांनी समंती दर्शवली आहे. राजकिय दलांतील संघवाद सोडला तर बाकी सर्व प्रमुख मुद्यांना संमती मिळाली आहे. त्यांनी दावा केला की, संविधानाचा मसुदा तयार करण्यामध्ये समावेश असलेल्या सर्व पक्षांनी नेपाळ नागरिकांना नागरिकत्व प्रदान करण्यावर संमती दर्शवली आहे. कोणत्या देशाला प्राधान्य दिले जावे याबाबत राजकिय पदांना सांभाळणा-या नेत्यांमध्ये पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचे माजी पंतप्रधान म्हणाले.

Leave a Comment