हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना मिळाली वर्ण भेदाची धमकी !

howard
न्यूयॉर्क : अमेरिकेतील प्रसिध्द हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील शेकडो विद्यार्थ्यांना वर्ण भेदावर आधारित ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अमेरिकेतीलतपास यंत्रणाया ई-मेलची तपासणी करत आहेत. या ई-मेलमध्ये दाव्याने म्हटले आहे की, एक व्यक्ती इवी लीग इंस्टिट्यूटमध्ये पोहोचेल आणि सर्व विद्यार्थ्यांना गोळीबार करून ठार मारून टाकेल. हार्वर्ड युनिव्हर्सिटी पोलिस या ई-मेलची तपासणी करीत आहेत. तसेच या आठवड्यात शेवटी यूनिवर्सिटीतील परिसरामध्ये स्वतःच्या उपस्थिती वाढवण्याची योजना बनवण्यात आली आहे. हार्वर्ड क्रिमसनमध्ये दाखल केलेल्या अहवालानुसार यूनिवर्सिटी पोलिसानी एफबीआई आणि स्थानिक तपास यंत्रणेने या ई-मेल बद्दल सूचित केले आहे. या ई-मेलमध्ये सांगितले की, शनिवारी ११ वाजता पोहोचून सर्वाना गोळीबार करून एक एक करून ठार मारून टाकणार आहे. या ई-मेलची भाषा वर्ण भेदी आहे. हा ई-मेल स्टेफैनी न्गूयेन नावाच्या एका व्यक्तीने केला आहे. बोस्टनमध्ये राहत असण्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. परंतू या ई-मेल करणा-याची ओळख एडुआडरे न्यूयेन स्वरूपात झाली आहे.