तिरंग्यात झगमगला नायगारा

nygara
अमेरिका आणि कॅनडाच्या सीमारेषेवर असलेला जगप्रसिद्ध नायगारा धबधबा १५ ऑगस्टला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यदिनादिवशी १५ मिनिटांसाठी भगवा, पांढरा आणि हिरवा या आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाला. आजपर्यंत असा मान कोणत्याचा देशाला मिळालेला नाही असेही समजते.

भारतीय अमेरिकन डॉक्टर संस्था, राजस्थान मेडिकल असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार करण्यात आले. या संस्थेच्या रजत जयंती कार्यक्रमानिमित्त आपल्या कुटुंबियांसह जमलेल्या सुमारे ३०० डॉक्टर्सनी यासाठी खास प्रयत्न केले होते. त्यांनी फार आधीपासूनच आवश्यक त्या सर्व परवानग्या काढण्याची यातायात करून नायगाराला भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगवून काढले. या दृष्याचे अनेक फोटो फेसबुक आणि व्हॉटस अॅपवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Leave a Comment