लेनोवोचा नवा ए८-५० टॅब्लेट

lenevo
लेनोव्होने त्यांच्या लेटेस्ट ए सिरीज मध्ये नवीन टॅब्लेट भारतीय बाजारात सादर केला आहे. ए ८-५० हा टॅब्लेट ८ इंची स्क्रीनचा असून त्याची किंमत आहे १७४९० रूपये. सध्या हा टॅब्लेट फक्त ऑनलाईन विक्रीसाठीच उपलब्ध करून दिला गेला आहे. हा टॅब्लेट अनेक रंगात सादर केला जात असला तरी भारतात आत्ता मिडनाईट ब्ल्यू रंगातच तो उपलब्ध आहे.

या टॅब्लेटला १६ जीबी इंटरनल मेमरी आहे मात्र मेमरी कार्डच्या सहाय्याने ती ३२ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. २० दिवस पुरेल इतकी स्टँडबाय सपोर्ट बॅटरी देण्यात आली असून वायफाय, टूजी, थ्रीजी कनेक्टिव्हीटी आणि ११ तासांचा टॉकटाईम त्याला देण्यात आला आहे.३६० ग्रॅम वजनाच्या या टॅब्लेटला ५ एमपीचा फिक्स फोकस कॅमेरा आणि २ एमपीचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

Leave a Comment