उद्धव ठाकरे आज नागपुरात

uddhav
नागपूर : भ्रष्टाचारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या ५ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भात ४ प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या दिवशी रेशिमबाग मैदानावरून स्वयंसेवकांना परिवर्तनाचा संदेश दिला. त्याच रेशिमबाग मैदानावरुन सायंकाळी ७ वाजता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशी माहिती शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख, आमदार डॉ. दीपक सावंत यांनी दिली. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच प्रचार दौरा आहे. सकाळी वर्धा येथील लोकमहाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील जिल्हा क्रीडा संकुलात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. सायंकाळी ४ वाजता भंडारा येथील दसरा मैदानात संबोधित करणार आहे. सायंकाळी ७ वाजता नागपूरच्या रेशिमबाग मैदानात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे.

Leave a Comment