बीसीसीआय केवळ पैशासाठी क्रिकेट खेळते ! – ओसीएच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप

bcci
इंचियोन : आशियार्इ खेळांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने आपला संघ सहभागी न केल्याबद्दल आशियार्इ ऑलंपिक परिषदेने टिका केली आहे. ओसीएने म्हटले आहे की, बीसीसीआय खेळाकडे केवळ व्यावसायिक उपक्रम म्हणून पहाते, ते योग्य नाही. ओसीएचे अध्यक्ष शेख अहमद अल फहद अल सबाह यांनी सांगितले की, त्यांनी दुस-यांदा अशाप्रकारे संघ पाठविलेला नाही. त्यांच्या निर्णयाचा सन्मान ठेवून मी सांगू इच्छितो की, त्यांना खेळाला प्रोत्साहन देण्यास कोणतेही स्वारस्य नाही, ते केवळ व्यवसायाप्रमाणे खेळाकडे पहातात आणि त्यातून पैसे मिळवू इच्छितात. ते म्हणाले की, बीसीसीआय केवळ आर्थिक स्थिती आणि खेळावर कसे नियंत्रण ठेवता येर्इल, येवढेच पहाते, एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांचे वागणे आहे. परंतु या मुलाला आता मोठे व्हायला हवे आहे.

४ वर्षापूर्वी ग्वांग्झू खेळादरम्यान क्रिकेटचा समावेश करण्यात आला. परंतु बीसीसीआयने आपला महिला आणि पुरुष संघ पाठवला नव्हता. ओसीएच्या अध्यक्षांनी वारंवार विनंती करूनही बीसीसीआयने संघ पाठवला नाही. शेख अल सबाह म्हणाले की, या भागात क्रिकेट लोकप्रिय खेळ आणि भारतात तर तो नक्कीच आहे. वुशू,कबड्डी, सेफ कटकरा हे खेळ ऑलंपिक खेळ नहीत, परंतु त्यांचे खेळाडू नेहमी सहभागी होत असतात आणि क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाला मात्र, मान्यता दिली जात नाही, ते पुढे म्हणाले की, संघ न पाठवून बीसीसीआयने क्रिकेटचे नुकसान केले आहे आणि असेच होत रहिले तर, हा खेळ कधीच ऑलंपिकचा भाग होऊ शकणार नाही. आम्हाला सर्व खेळांना चांगले वातावरण मिळवुन द्यायचे आहे. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान यांच्याशिवाय चीन आणि दक्षिण कोरियाच्या पुरुष आणि महिला संघाने देखील भाग घेतला पण, भारताचा संघ सहभागी झाला नाही, हे दु:खदायक आहे.

Leave a Comment