मोदींच्या फेसबूक चाहत्यांची संख्या सर्वाधिक !

modi1
वॉशिंग्टन – पंतप्रधान मोदी यांचे फेसबूक चाहते भारता प्रमाणाचे अमेरिकेतही पसरलेले आहेत. अमेरिकेतील गव्हर्नर आणि इतर नेत्यांच्या तुलनेत मोदींच्या फेसबूक चाहत्यांची संख्या जास्त आहे. समुह संपर्क माध्यमांचे नोंद ठेवणारे माध्यम सोशल बेकर्सनुसार अमेरिकेत मोदींच्या चाहत्यांची संख्या सुमारे १ कोटी ७० लाखापर्यंत आहे. जे अमेरिकेच्या नेत्यांहूनही अधिक आहे. बेकर्स माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूकी दरम्यान मोदी यांनी माध्यमांचा वापर केला होता. त्यामुळे ते आज सर्वात अधिक लोकप्रिय झाले आहेत. राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या अमेरिकेतील चाहत्यांची संख्या १ कोटी ५१ लाख इतकी असून बाहेर ही संख्या ३ कोटी ७८ लाख इतकी आहे.

Leave a Comment