पाकिस्तान सैन्य हवाई हल्ल्यात १५ अतिरेकी ठार !

attack
इस्लामाबाद – पश्चिमोत्तर कबायली परिसरात पाकिस्तानी सैन्यांच्या हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये १५ अतिरेकी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी तालिबान अतिरेक्यांना नष्ट करण्यासाठी एक चळवळ सुरु केले होते. अलकायदाशी संबंध असलेल्या अतिरेक्यांचे आश्रय स्थान असलेले खबर जिल्ह्यातील जमरुद आणि बारा सब डिव्हीजन परिसरात पाक सैन्यांकडून हल्ले करण्यात आले. सैन्यांनी सांगितले की या हल्ल्यात १५ अतिरेकी ठार आले आहेत. सैन्यांनी आतापर्यंत अतिरेक्यांचे तीन ठिकण नष्ट केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणीस्तानात हल्ले करणा-या आणि तालिबान व अलकायदाशी संबंध असलेल्या अतिरेक्यांनी कबायली क्षेत्रात आपले प्रभुत्व गाजवले आहे. पाकिस्तानने ‘जर्ब ए अज्ब’ या बहुप्रतिक्षित सैन्य अभियानाला सुरुवात केली आहे. उत्तर वजीरिस्तानाला नष्ट करणे या अभियानाचा उद्देश आहे. विमानतळावरील सैन्य हल्ल्यात ३७ जण ठार झाले होते. सेनेने दावा केला आहे की, अभियान सुरु केल्यानंतर आतापर्यंत सुमारे १००० अतिरेक्यांना ठार करण्यात आले आहे. हल्ल्यात ८२ सैन्यांचा देखील मृत्यू झाला आहे.

Leave a Comment