‘आयसिस’ दहशतवाद्यांच्या कृत्याची ओबामांनी केली निंदा

obama
वॉशिंग्टन – सीरिया आणि इराकच्या सीमारेषेवरील भागाचा ताबा मिळविलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा ब्रिटिश नागरिक एलन हेनिंग यांचा शिरच्छेदाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आयसिसने अमेरिकन नागरिक पीटर कासिंग यांच्या शिरच्छेदाची धमकी देतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ओबामा, तुम्ही सीरियावर हवाई हल्ले करत आमच्या नागरिकांना लक्ष्य केले. त्यामुळे तुमच्या नागरिकांवर हल्ले करणे हा आमचा अधिकार आहे, असा इशाराही त्या व्हिडिओद्वारे देण्यात आला आहे. दहशतवादी संघटना आयसिस यांच्या या क्रुरकत्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निंदा केला आहे.

ओबामा म्हणाले की, या हत्येप्रकरणी जबाबदार असलेल्यांना कदापि माफ केले जाणार नाही. हेनिंग येथे सीरियाच्या नागरिकांचे काम करत होता. त्यांच्या हत्यानंतर ब्रिटिशांसह ज्या लोकांनासाठी हेनिंग काम करत होता. त्यांचे नुकसान झाले आहे. ओबामा यांनी हेनिंगच्या कुटूंबियाचे सांत्वन करताना म्हटले की, अशा कठीण परिस्थितीत मी त्यांच्य कुटुंबियांसोबत आहे. या दरम्यान त्यांनी आयसिस या दहशतवादी संघटनेचे समूळ नष्ट करण्याचा इशारा देखील दिला.

४७ वर्षीय हेनिंगला आयसिसने मागील वर्षी डिसेंबरमध्ये सीरियामध्ये बंदी बनवले होते. टॅक्सी चालकाचे काम करणारा हेनिंग काही कामानिमित्त तेथे गेला होता. हेनिंग दुसरे ब्रिटिश नागरिक आहे. ज्याचे आयसिस या दहशतवादी संघटनेने शिरच्छेद केला. हेनिंगची पत्नी वारंवार दहशतवाद्यांना विनंती करत होती की, त्यांना सोडून द्यावे. कारण, ते सीरियामधील गरीब मुस्लिमांची ते मदत करत होते. यापूर्वी आयसिसने ब्रिटिश नागरिक डेविड हेन्स यांची हत्या करून व्हिडिओ प्रसारित केला होता. तसेच अमेरिकेतील पत्रकार जेम्स फोले आणि स्टीवेंस सोटलॉफ यांची देखील हत्या करून व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आता एलन हेनिंग यांचा शिरच्छेद करून व्हिडिओ प्रसारित केला आहे. हेनिंग यांच्या हत्येच्या व्हिडिओची सत्यता तपासून पाहिली जात असल्याचे ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. सीरिया आणि इराकमध्ये हातपाय पसरत असलेल्या ‘आयसिस‘विरुद्ध अमेरिकेने मोहिम सुरू केली आहे. ब्रिटननेही या मोहिमेत अमेरिकेची साथ दिली आहे. नुकतेच ब्रिटिश हवाई दलाने इराकमध्ये ‘आयसिस‘च्या काही अड्ड्यांवर हवाई हल्लेही केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ‘आयसिस‘ने ब्रिटिश नागरिकाचा शिरच्छेद करत ब्रिटनला इशारा दिला आहे.

Leave a Comment