कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात सेनेची एकाकी लढत !

shivsena
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभेचा निवडणूक प्रचार हा मंदावलेल्या अवस्थतेत असल्याचे चित्र आहे. ठाण्यात अनेक मतदार संघातपंचरंगी निवडणूक असल्याचे चित्र असले तरीही बऱ्याचशा मतदारसंघात खऱ्या अर्थाने दुरंगी किंवा तिरंगी लढती आहेत. ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेनेची एकाकी लढत दिसत आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे दोन वेळा निवडून आलेआहेत. शिवसेनेच्या गोठात हा मतदारसंघ शिवसेनेचाच असा समज असून हा मतदार संघ सेनेसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदार संघ मानला जातो.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ मध्यमवर्गीय माणसाचा मतदारसंघ आहे. कामगार वस्ती आणि डोंगराळ भाग असलेल्या या मतदारसंघात दलित, उत्तर भारतीय आणि कष्टकरी जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. गेल्या १० वर्षापासून शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे हेनिवडून येत आहेत. मागील निवडणुकीत शिंदे यांना तब्बल ७३ हजार ५०२ मते मिळाली होती. विरोधात उभे असलेले कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांना ४० हजार ७२६ तर मनसेचे राजन गावंड यांना ३५ हजार ९१४ मते मिळाली होती. दरम्यान कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात उत्तर भारतीय मतदाराची संख्या जवळपास १ लाख ५० हजार तर इतर समाजाची ३० हजार मतदार आहेत. उर्वरित हे मराठी मतदार आहेत. अशा परिस्थितीत या मतदारसंघात शिवसेना हाच बलाढ्य पक्ष आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ४० हजार मते मिळाली होती. पण यंदा मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असताना मताची संख्या रोडावणार आहे. यावेळी याच मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे डॉ बिपीन महाले,कॉंग्रेसचे मोहन तिवारी, भाजपचे संदीप लेले तर मनसेच्या सेजल कदम हे उमेदवार आहेत. वास्तविक पाहता मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असलेल्या मतदारसंघात मनसेला केवळ राज ठाकरे याच्या इंजिनाचा दिलासा मिळणार आहे. व्यक्तिगत मताची संख्या ही नगण्यच राहणार आहे. तर राष्ट्रवादीचे डॉ बिपीनमहाले हे लोकांना परिचितच नाहीत. राजकारणात सक्रिय नसताना पक्षाची उमेदवारीमिळाल्याने त्यांनाही पक्षाच्या निशाणीवर मिळणारी मतेच मिळणार असल्याचे चित्रआहे. तर कॉंग्रेसचे उमेदवार मोहन तिवारी यांना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असल्याने चांगली मते मिळू शकतात. अखेरचा आणि महत्वाचा उमेदवार भाजपचे संदीप लेले हे होय. भाजपात सक्रिय पण आजवर नगरसेवकही होऊ न शकलेले लेले यांना मतदारसंघात स्वकर्तुत्वकिंवा कामे याचा आधार नसल्याने तसेच लोकांमध्ये सक्रिय नसल्याने मतांचा जास्त फायदा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे याचा फायदा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनाच होणार अशी चिन्ह दिसत आहेत. या मतदारसंघात आमदार एकनाथ शिंदेचे प्राबल्य आहे.त्यातच दोन वेळा निवडून आल्याने आणि स्थानिक लोकांना नगरसेवकाच्यामाध्यमातून मुलभूत सुविधा मिळवून देण्याचा मोठा आधार एकनाथ शिंदे यांनामागील दोन वर्षात लाभला आहे . यंदाही त्यांना हा आधार मिळणार असे चित्रनिवडणूक रिंगणात असलेल्या उमेद्वारावरून स्पष्ट होत आहे. शिवसेना आणि भाजपास्वतंत्र लढत असल्याने भाजपची लहर,नरेंद्र मोदीची लाट येणार असा समज आहे.पण या मतदारसंघात लाट वगैरे काही दिसत नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या समोर कुठल्याच पक्षाचा सक्रिय आणि कार्य करणारा नेता किंवा नगरसेवकनाही. त्यामुळे पक्षाच्या विकासकामाच्या लोकप्रियतेशिवाय कर्तुत्वाची शिदोरीनसलेल्या उमेदवारात पुन्हा एकदा आमदार एकनाथ शिंदे यांची एकाकी लढतअसल्याचे चित्र आहे.

Leave a Comment