पंतप्रधानांच्या सभेसाठी नाशिक पोलीस सज्ज

polce
नाशिक – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नाशिकमध्ये येत आहेत. यावेळी पंचवटी येथील तपोवन परिसरात पंतप्रधानांची प्रचारसभा होणार असून या सभेसाठी नाशिक पोलिसांनी चोख बंदोबस्ताची तयारी सुरु केली आहे. पंतप्रधानांसोबत त्यांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असली तरी स्थानिक पोलिसांकडून देखील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पंचवटीतील साधुग्राममध्ये होणार आहे. या सभेसाठी जिल्ह्याच्या अनेक भागांतून लोक येण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यावेळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरून दुपारी दोन ते रात्री अकरा या वेळेत वाहतूक मार्गात काही बदल करण्यात येणार आहेत. तर काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणी वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा देखील अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment